शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धा प्रिमियर, मंबई पोर्ट ट्रस्ट आणि शिवशक्ती अजिंक्य

---Advertisement---

मुंबई – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण गटात अलिबागच्या प्रिमिअर ताडवागळे संघाने तर पुरुष शहरी विभागात मंबई पोर्ट ट्रस्टने अजिंक्यपद पटकावले आहे. महिला खुल्या गटात शिवशक्ती संघ विजेता ठरला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार क्रीडा भवन येथील मैदानात शनिवारी दि.25 एप्रिल रोजी स्पर्धेचे अंतिम सामने झाले. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 29 वी आणि महिलांची 24 खुली स्पर्धा होती. राज्यभरातील 102 संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू माया आक्रे आणि अशोक शिंदे, अपर कामगार आयुक्त रविराज इळवे, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह विश्वास मोरे, कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भाग्यश्री भुर्के आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने स्पर्धा पार पडली. केईएम रुग्णालयाच्या चमुने वैद्यकीय सहाय्य केले. विनय थळे यांनी निवेदन व सुत्रसंचालन केले तर उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांनी आभार मानले. राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या पुरुष ग्रामीण विभागात सलग ५ वेळा जेतेपद पटकावलेल्या जेएसडब्लु डोलवी संघाला नमवत अलिबागच्या प्रिमिअर ताडवागळे संघाने बाजी मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठी धुमश्चक्री बघायला मिळाली. पहिल्या डावात जेएसडब्लु संघाने २ बोनस आणि एका अव्वल पकडीच्या जोरावर १८-१४ अशी ४ गुणांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात मात्र प्रिमिअर संघाने जोरदार कमबॅक करत जेएसडब्लुला २१-२६ अशी ५ गुणांची आघाडी घेत एका गुणाने स्पर्धा जिंकली. गेला असता प्रिमिअरने त्याला जागीच गार केल्यामुळे ऑलआऊटचे ३ गुण पटकावत सामन्यावर ३९-४० अशी एका गुणाची आघाडी घेतली आणि सलग ५ वर्ष जेतेपद पटकावलेल्या जेएसडब्लुचे वर्चस्व मोडून काढले. दुसरीकडे पुरुष शहरी गटातही अंतिम सामन्यात मंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्यु इंडिया इन्शुरन्स यांच्यात चांगली लढत बघायला मिळाली. पहिल्या डावात न्यु इंडिया इन्शुरन्सने १ बोनस आणि २ लोणसह ११-१७ अशी ६ गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात मंबई पोर्ट ट्रस्टने २ उत्कृष्ट पकड आणि २ लोणसह १७-०८ असे जोरदार कमबॅक केले आणि २८-२५ अशा ३ गुणांच्या फरकासह सामना जिंकला.

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती संघाने रुबी कन्स्ट्रक्शनवर ४२-२७ असे १५ गुणांचे वर्चस्व मिळवत सामना सहज जिंकला. पहिल्या डावातच शिवशक्तीने आक्रमक खेळ दाखवत २६-१३ अशी १३ गुणांची आघाडी घेतली आणि रुबी कन्स्ट्रक्शनचे मनोधैर्य खच्ची केले. शिवशक्तीकडून रुणाली भुवड व सोनाली शिंगटे यांनी खोलवर चढाया तर पौर्णिमा जेधे व अक्षता पाटील यांनी उत्कृष्ट पकड केल्या. दुसऱ्या डावातही शिवशक्तीने १६-१४ अशी आघाडी कायम ठेवत सामन्यावर वर्चस्व काय ठेवले. रुबी कन्स्ट्रक्शनकडून प्रसिदा पन्हाळकर व समद्धी मुंगुरुकर यांनी उत्कृष्ट चढाई तर प्रांजल पवार व पुजा जाधव यांनी उत्कृष्ट पकड केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment