शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सीसीआय, डी वाय पाटील संघ विजयी, यजमान एसपीजी पराभूत

---Advertisement---
  • विजय मांजरेकर ,रमाकांत देसाई टि२० क्रिकेट

मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित स्वर्गीय विजय मांजरेकर ,रमाकांत देसाई एसपीजी टि२० स्पर्धेत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया , डी वाय पाटील स्पोर्टस अकादमी , कर्नाटक स्पोर्टस क्लब आणि इस्लाम जिमखाना संघानी विजयी सलामी दिली . पण गतविजेता पार्कोफिन क्रिकेटर्स आणि यजमान शिवाजी पार्क जिमखाना संघांचे स्पर्धेतील आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. या स्पर्धेला आयडीबीआय बँक आणि एलआयसीचा पुरस्कार लाभला आहे.
शिवाजी पार्क जिमखान्याच्या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी स्पर्धेचे उदघाटन करताना स्पर्धा सुरू करत आहे . लवकर सामन्याना सुरूवात करा आणि चांगला खेळ करा अशा मोजक्या शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्याच हस्ते शिवाजी पार्क जिमखान्याविषयीच्या मान्यवरांच्या आठवणीं असलेल्या खाण रत्नांची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. जिमखान्याच्याच मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसपीजीने २० षटकांत सात खेळाडूना गमावून १८९ धावा केल्या . रझा मिर्झाने ४२ , आशय दुबेने ५३ आणि दशरथ चव्हाणने ३०धावा केल्या . कर्नाटक स्पोर्टस संघासाठी प्रथमेश डाकेने ३९ धावांत दोन आणि वैभव माळीने ३३ धावांत दोन बळी घेतले . सलामीचा फलंदाज अनिष चौधरीच्या ७१ आणि गौरीश जाधवच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टस संघाने १८ . ३ षटकांत चार खेळाडूना गमावून १९३ धावा करत सामना जिंकला . बेंगॉल क्रिकेट क्लबवर व्हिक्टरी क्रिकेट क्लब आणि डी वाय पाटील स्पोर्टस अकादमी संघांत खेळला गेला . या सामन्यात व्हिक्टरी संघाचा सलामीचा फलंदाज जय बिस्तने स्पर्धेतील पहिले शतक झळकावूनही त्याच्या संघाला डी वाय पाटील संघाकडून सहा खेळाडू राखून पराभव स्विकारावा लागला .
पहिल्या फेरीचे निकाल ः व्हिक्टरी क्रिकेट क्लब दोन बाद २२७ (,जय बिस्त नाबाद ११५ ,शाश्वत जगताप ६१ ) पराभूत विरूद्ध डी वाय पाटील स्पोर्टस अकादमी चार बाद २३० (प्रणव केला ६६ , अभिग्यान कुंडू ७२ हर्ष जाधव ३८ , रॉयटन डायस २/ ४६ , यंग महाराष्ट्र संघ १२१ ( तन्मय कदम ३३ ,ध्रुमील मटकर ३/ २७ , पार्को.फिन क्रिकेटर्स सात बाद १९२ (आर्यन पटणी ३४ ,सागर मिश्रा ४८ ,आयुष जेठवा नाबाद३६ , विनायक भोईर ४ /४४ पराभूत विरूद्ध इस्लाम जिमखाना सहा बाद १९३ प्रणय कपाडीया ४९ , अमोघ भटकळ ४६

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment