शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मार्श मॅकलेननला विजेतेपद

---Advertisement---

ठाणे : मार्श मॅकलेनन संघाने अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाचा ११० धावांनी दणदणीत पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेतील क गटाचे विजेतेपद संपादन केले. विजयासाठी १९९ धावांचा पाठलाग करणाऱ्या अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाला ८९ धावांवर गुंडाळत मार्श मॅकलेनन संघाने विजय निश्चित केला.
प्रदिप शर्मा, चिन्मय कदम आणि हर्ष मिश्राने बऱ्यापैकी फलंदाजी करत संघाला दिड शतकी धावसंख्या उभारुन दिली. प्रदिपने ३८, चिन्मयने नाबाद ३७ आणि हर्षने २२ धावा केल्या. या डावात पराभूत संघाच्या अजिंक्य पवारने तीन बळी मिळवले. तर सोनू जयस्वार, प्रतिक भोसले, देवकिरण चेट्टी, ओमकार सावंत आणि वैभव मुजगेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
उत्तरादाखल मार्श मॅकलेनन संघाच्या नियंत्रित गोलंदाजी समोर अप्लाइड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांच्या हृतिक परबने १९ आणि वैभव मुजगेने १५ धावा बनवल्या. संघाला विजयाची दिशा देताना शिवप्रकाश जैस्वालने तीन, आशुतोष घागरेने दोन आणि केतन खरात, चिन्मय कदम, श्रेयस केळकरने प्रत्येकी एक बळी मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment