शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

नेहरू सेंटरमध्ये नील माधवांचा पारंपारिक दशावतार मुंबईकरांसाठी होणार सादर

---Advertisement---

मुंबई : नेहरू सेंटरने विष्णू आणि कृष्ण यांच्या लौकिकतेविषयी ओडिया साहित्यात उपलब्ध असलेल्या कथेवर ‘नील माधव’ यांचा अस्सल पारंपारिक दशावतार मुंबईकरांना शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.३० वाजता अनुभवता येणार आहे. वरळी नेहरू सेंटरच्या आलिशान नाट्यगृहात दशावतार रंगणार आहे. रात्रभर साकार करावी अशी ही कलाकृती असते परंतु वेळेची मर्यादा, प्रेक्षकांची जीवनशैली, आटोपशीर मनोरंजन लक्षात घेऊन अवघ्या तीन तासात ही कलाकृती प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आनंद नार्वेकर, सागर गावकर, प्रथमेश परब, एकनाथ परब, निलेश नाईक, प्रशांत गावडे, उल्हास नाईक, संतोष गावडे, अभिषेक मयेकर, चंद्रकांत परब, दत्ताराम गोडकर, दीपक मयेकर, गजानन वेंगुर्लेकर या कलाकारांचा या दशावतारामध्ये सहभाग आहे. घनश्याम पालव, चिन्मय सावंत, महेश नाईक, महादेव दळवी यांची संगीत साथ या लोककलेला लाभलेली आहे. तुषार नाईक अध्यक्ष आणि सोनू नाईक हे या मंडळाचे संचालक आहेत. १० एप्रिल पासून प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेशिका नेहरू सेंटरच्या तिकीट खिडकीवर सकाळी १०.३० वाजल्या पासून उपलब्ध होणार आहेत. देवगड, वेंगुर्ले, मालवण, सिंधुदुर्ग परिसरातील लोककलेचा अभ्यास केल्यानंतर ‘दशावतार’ हा प्रामुख्याने इथल्या प्रेक्षकांचा खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा भाग राहिलेला आहे. कितीतरी कलाकारांनी या दशावताराला ईश्वरसेवा म्हणून स्वीकारलेले आहे. स्री विरहीत लोकनाट्य ही या लोककलेची खासियत आहे. आठशे वर्षांहून अधिक मोठी परंपरा आहे जी पूर्वापार चालत आलेली आहे.नेहरू सेंटरने शास्त्रीय गायन, नृत्य, वादन यांना प्राधान्य देताना परंपरेने आलेल्या लोककलेला सुद्धा तेवढेच प्राधान्य दिलेले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment