शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मनोलीत आ. अमोल खताळ यांनी लुटला फुगडी खेळण्याचा आनंद

---Advertisement---

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील मनोली येथे सुरु असणाऱ्या हनुमान अखंड हरिनाम सप्ताहात अबालकवृद्ध महिला पुरुष लहान मुले मुली तसेच भजनी भावीक भक्तांबरोबर आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला

संगमनेर तालुक्यातील मनोली येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहात आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली.सप्ताह कमिटीचे अध्यक्ष देविदास शिंदे यांच्या हस्ते आ अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काही आबालवृद्ध पुरुष आणि महिलाबरोबर तसेच बालवारकऱ्यांसमवेत आमदार अमोल खताळ यांनी फुगडी खेळली . यावेळी बोलताना ते म्हणाले की आमच्या परिवाराला सुद्धा धार्मिकतेचा वारसा लाभलेला आहे, माझी आई प्रत्येक वर्षी वारी करतेवारीतून खऱ्या अर्थाने एक सकारात्मक ऊर्जा मिळते तशीच ऊर्जा अखंड हरिनाम सप्ताहच्या माध्यमातून मिळत असल्याचे र्त्यांनी सांगितले. यावेळी भाजप राज्यकार्यकारी परिषद परषद सदस्य दादाभाऊ गुंजाळ , भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे ; किसन शिंदे, रुपम गाडेकर, मछिंद्र भागवत, काशिनाथ साबळे , सोन्याबापू ठोसर बाबासाहेब ठोसर संदीप बेंद्रे गणेश शिंदे राजेंद्र शिंदे अप्पा बेंद्रे आदीसह मनोली ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

स्व. अशोकराव मोरे दूध संस्थेच्या चेअरमनपदी बादशहा वाळुंज तर व्हा . चेअरमनपदी अनिल कर्पे

पायरेन्स आयबीएमए , डॉ. विखे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय आणि पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी

सोनगाव येथे प्रवरेच्या कृषीकन्यांचे आगमन

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

रयतच्या नव्या नेतृत्वाचा सात्रळमध्ये जल्लोष,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पदाधिकाऱ्यांच्या सत्काराने रयत संकुल दुमदुमले

Leave a Comment