शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव काळात६ कोटी ३१ लाख दानपेटीत जमा

---Advertisement---

शिर्डी प्रतिनिधी / श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने बुधवार ९ ते . ११ जुलै या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सवात दक्षिणापेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट-क्रेडीट कार्ड, युपीआय, सोने, चांदी व दर्शन/आरतीपास शुल्‍क इ. सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्‍कम सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
रोख स्‍वरुपात १ कोटी ८८ लाख ८ हजार १९४ दक्षिणा पेटीत प्राप्‍त झाली असून, देणगी काऊंटर १ कोटी १७ लाख ८४ हजार ५३८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्‍क पास ५५ लाख ८८ हजार २००, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण २ कोटी ५ लाख ७६ हजार ६२६ रुपये, सोने ६६८.४०० ग्रॅम रक्‍कम रुपये ५७ लाख ८७ हजार ९२५ व चांदी ६,७९८.६८० ग्रॅम रक्‍कम रुपये ०५ लाख, ८५ हजार ८७९ यांचा समावेश आहे.
३ लाखाहून अधिक साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला तीन दिवसांत साईप्रसादालयाद्वारे सुमारे १ लाख ८३ हजार ५३२ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत १ लाख ७७ हजार ८०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आले. या कालावधीत सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्‍या विक्रीतून ६४ लाख ५ हजार ४६० रूपये प्राप्‍त झाले. उत्‍सव काळात हजारो साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती निवासस्‍थान, साईआश्रम निवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरीता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला.
सदर देणगीचा वापर श्री साईबाबा संस्‍थानचे प्रसादालय, रुग्‍णालये, शैक्षणिक संकुल यासेवाकार्या बरोबरच साईभक्‍तांच्‍या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

स्व. अशोकराव मोरे दूध संस्थेच्या चेअरमनपदी बादशहा वाळुंज तर व्हा . चेअरमनपदी अनिल कर्पे

पायरेन्स आयबीएमए , डॉ. विखे पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय आणि पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी

सोनगाव येथे प्रवरेच्या कृषीकन्यांचे आगमन

गुणवत्ता, आधुनिक सुविधांवर भर द्या-पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

रयतच्या नव्या नेतृत्वाचा सात्रळमध्ये जल्लोष,गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पदाधिकाऱ्यांच्या सत्काराने रयत संकुल दुमदुमले

Leave a Comment