शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

१७ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी अहिल्यानगरात

---Advertisement---

अहिल्यानगर : शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे १७ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन येत्या २३ व २४ मे २०२६ रोजी अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
या संदर्भात परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जाधव लॉन्स येथे सहकार्यवाह प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत संमेलनाच्या आयोजनासंदर्भात विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा. डॉ. अशोक कानडे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, खजिनदार भगवान राऊत, सहसचिव प्रा. डॉ. अनिल गर्जे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र चौभे, राजेंद्र पवार, मकरंद घोडके तसेच कवयित्री शर्मिला गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात दोन काव्यसंमेलने, गझल संमेलन, परिसंवाद, चर्चासत्रे, मान्यवरांच्या मुलाखती, शाहिरी जलसा, मोटारसायकल व कार रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक व सामाजिक पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार वितरण तसेच विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण असा दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरातील मान्यवर साहित्यिकांसह जिल्ह्यातील साहित्यिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असल्याची माहिती कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांनी दिली.
संमेलनाच्या निमित्ताने विविध समित्यांची स्थापना व स्वागताध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार असून नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी इतिहास परिषदेचे संस्थापक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कविवर्य मा. आ. लहू कानडे,संस्थापक सचिव सुनील गोसावी यांना जाहीर झालेल्या उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्काराबद्दल, काव्य संमेलन अध्यक्षपदी निवडीबद्दल शर्मिला गोसावी यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र चौभे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment