शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये ‘अमेझिंग’च्या 130 विद्यार्थ्यांचा सहभाग

---Advertisement---


अहिल्यानगर – चेन्नई येथील ईसीएमएस या संस्थेने आयोजित केलेल्या अबॅकस ऑफलाइन इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये नगरमधील अमेझिंग अबॅकसच्या राज्यभरातील 20 शाखांमधील 130 विद्यार्थी सहभागी झाले होते. पाईपलाईन रोडवरील श्रीकृष्ण हॉल येथे झालेल्या या स्पर्धेत अमेझिंगच्या नगरमधील शाखांसह मुंबई, नागपूर, पुणे, सिल्लोड, आळंदी, बुर्‍हाणनगर आदी शाखांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
अबॅकसच्या या इंटरनॅशनल ऑफलाईन स्पर्धेत अमेझिंग अबॅकसच विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या नियोजनासाठी अमेझिंग अबॅकसचे संचालक किरण बल्लाळ आणि संचालिका अश्विनी बल्लाळ यांच्यासह शिक्षिका प्रज्ञा विभूती, डिंपल शर्मा, जयश्री कांबळे, शिल्पा निर्मळ, श्रद्धा देशमुख, कांचन दंडाळे यांनी परिश्रम घेतले.
अबॅकस ही मानसिक गणना आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्याची एक पारंपारिक पद्धत आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता बौद्धिक क्षमतावृद्धीबरोबरच जलद व अचूक गणना करण्यासाठी अबॅकस महत्त्वाचे साधन ठरले आहे. हे महत्त्व ओळखून अमेझिंग अबॅकसने राज्यभरात 20 शाखा स्थापन केल्या आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी होत आहे, असे संचालिका अश्विनी बल्लाळ यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment