“आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही”; मागण्या मान्य करण्याबाबत शिक्षण मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : मुंबईत मंगळवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन विधानपरिषद आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
तसेच दि. २१ मे रोजी शिक्षण आयुक्तांसोबत आयोजित बैठकीसंदर्भातही त्यांनी मंत्र्यांशी संवाद साधत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या व अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी, मागण्या मान्य न झाल्यास दि. २५ मे रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यावर मंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही,” असे आश्वासन दिले.







