शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

यशवंत प्रतिष्ठान राबवणार ‘माझे गाव माझी नदी’ स्वच्छता अभियान.

---Advertisement---

(१२मे जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपक्रम)

(युवा नेते उदयन गडाख यांनी यशवंत प्रतिष्ठान तर्फ १०लाख देणगी जाहीर केली)

सोनई –नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातून वाहणाऱ्या कौतुकी नदीच्या स्वच्छता आणि पुनरुज्जीवनासाठी आता सोनई येथील यशवंत प्रतिष्ठान सामाजिक मार्फत १२मे रोजी जेष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “माझे गाव… माझी नदी…” हा उपक्रम राबवणार आहे.
सोनई येथील माजी मंत्री शंकरराव गडाख व मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून सोनई परिसरात मोठे लोकचळवळीचे अभियान उभे राहिले आहे.सोनई परिसरात कौतुकी मध्ये अनेक वर्षांपासून साचलेला कचरा, सांडपाणी आणि दुर्लक्षामुळे दूषित बनलेल्या कौतुकी नदीचे रूप पालटण्यासाठी ग्रामस्थांनी एकमुखाने पुढाकार घेतला आहे.तसेच मुळा एज्युकेशन संस्था उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख यांनी १२मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कौतुकी नदी शुशोभीकरण व स्वच्छतेसाठी तब्बल १० लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली आहे. या निधीतून नदीपात्रातील कचरा हटविणे, गाळ काढणे, सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना करणे तसेच नदी संवर्धनासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत कौतुकी नदीत घरगुती व व्यावसायिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली होती, तर पावसाळ्यात पाणी प्रवाह अडथळ्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्र येत नदी वाचविण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले की, “नदी स्वच्छतेचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात येईल. ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिक यांच्या सहकार्याने नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या स्वछता मोहिमेचे सर्व श्रेय ग्रामस्थांचे असेल असे यावेळी मारुती मंदिरातील बैठकीत युवा नेते उदयन गडाख म्हणाले.

या स्वच्छता अभियानांतर्गत नदीकाठावरील अतिक्रमणे, कचरा टाकण्याचे प्रकार आणि सांडपाण्याचा विसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.
“माझे गाव… माझी नदी…” या अभियानामुळे सोनई परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून युवक, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्ग देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. नदी संवर्धनासाठी जनजागृती रॅली, श्रमदान मोहीम, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment