श्रीरामपूर : तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने २०२५-२०२६ आर्थिक वर्षामध्ये १ कोटी ५० लाख ७१ हजार रुपयांचा नफा मिळविला आहे. ग्राहकसेवा, पारदर्शकता आणि कोअर बँकींग सुविधांवर भर दिल्याने संस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन केलेला आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे एकूण ठेवी ११७ कोटी ७७लाख ८ हजार इतक्या झाल्या असून लवकरच १५० कोटींचा टप्पा पार होईल, असा विश्वास संस्थेचे चेअरमन साहेबराव रक्टे व व्हा. चेअरमन मधुकर सातव यांच्यासह संचालकांनी व्यक्त केला.
संस्थेचे महाव्यवस्थापक माधव निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या एकूण सात शाखा आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५५५ कोटी ४२ लाख ५३ हजार इतका झाला आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल हे ३ कोटी ८ लाख ५० हजार असून स्वनिधी हा १० कोटी ११ लाख ४७हजार आहे. संस्थेकडे ५ कोटी ९९ लाख ६५ हजार इतका राखीव व इतर निधी आहे. संस्थेने तरलता पोटी ४२ कोटी ९६ लाख ७८ हजारची बँकेत गुंतवणूक केलेली असून एकूण कर्ज वाटप ८२ कोटी ८ लाख ८२ हजार इतके आहे. संस्थेचा सीडी रेशो हा ६२.७८ टक्के इतका आहे. संस्थेने कोअर बँकींग सुविधा, आरटीजीएस सुविधा, लाईटबिल भरणा, लॉकर सुविधा, क्यू आर कोड सुविधा सभासदांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. संस्थेच्या आर्थिक कामकाज वाढीकरीता सर्व संचालक, सभासद ठेवीदार व कर्जदार, सेवक वर्ग, एजंट यांचे सहकार्य मिळत असल्याचे महाव्यवस्थापक माधव निंबाळकर यांनी सांगितले.







