शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भारती हॉस्पिटलमध्ये ‘जागतिक आपत्कालीन वैद्यकशास्त्र दिन’ उत्साहात साजरा

---Advertisement---

पुणे : जागतिक आपत्कालीन वैद्यकशास्त्र दिन २७ मे रोजी साजरा केला जातो. यावर्षिची जागतिक संकल्पना ‘आपत्कालीन वैद्यकीय पथकांसाठी सुरक्षित जागा – हिंसाचार थांबवा’ अशी होती. यावरून जेंव्हा आपत्कालीन स्थितीत रुग्ण येतो तेंव्हा होणारा हिंसाचार हा महत्वाचा घटक असल्याचे अधोरेखित होते. त्यामुळे या टीमच्या सुरक्षेसाठी रुग्णालयाने केलेले नियम आणि दिलेली जागा ही महत्वाची आहे. नातेवाईकांच्या तीव्र भावना आणि नियम याची सांगड घालून रूग्नांवर उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी समाजात जागृती गरजेची आहे.
अपघाता आणि ह्रदयविकार सारखी आपत्कालीन स्थिती आल्यानंतर रक्ताचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यामुळे यावेळी भारती हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘ईएम वॉरझोन’ (EM Warzone) ही विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. ज्याद्वारे भावी डॉक्टरांची जलद निर्णयक्षमता आणि आपत्कालीन कौशल्ये तपासण्यात आली.
यावेळी कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांनी विशेष संदेशाव्दारे सर्व टीमचे कौतुक करून जीव वाचवण्यासाठी करत असलेल्या कमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, विभागप्रमुख डॉ. पुष्कर शाह, क्लिनिकल हेड डॉ. श्वेता त्यागी यांनी आपत्कालीन वैद्यकशास्त्राचे समाजातील महत्त्व आणि वेळेवर मिळणाऱ्या उपचारांची गरज यावर प्रकाश टाकला. आपत्कालीन विभागातील टीमच्या धैर्याला आणि निष्ठेला हॉस्पिटल प्रशासनाने या दिनानिमित्त सलाम केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment