शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे- माजी मंत्री थोरात

---Advertisement---

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण….

संगमनेर – वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोकादायक असून हे टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे आहे. याकरता येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान दोन झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दंडकारण्य अभियान आढावा घेण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक मा आ.डॉ सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले, सौ.दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सुनील कडलग, रावसाहेब दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, समन्वयक दशरथ वर्पे, डॉ सुजित खिलारी, अनिल थोरात, सेक्रेटरी किरण कानवडे, प्रा व्ही बी.धुमाळ, कृष्णा दिघे, बाळासाहेब फापाळे, वन विभागाच्या अधिकारी श्रीमती हिरे, संतोष पारधी, परते यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जगापुढे ग्लोबल वार्मिंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढती उष्णता कमी झालेला पाऊस हे अत्यंत चिंतेचे आहे. यावर्षी देशांमध्ये कमी पाऊस सांगितला आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे या समस्या होत असून यापुढील काळात प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन केलेच पाहिजे.मा आ डॉ तांबे, तर सौ दुर्गाताई तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग पाटील घुले यांनी केले, तर दशरथ वरपे यांनी आभार मानले. कारखाना कार्यक्षेत्रात 101 अंबा वृक्षांची रोपण यावेळी करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment