शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पैठण येथे विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडले

---Advertisement---

पैठण : पैठण येथे विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात खंडोबा मंदिर, पेठ येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली.
यानंतर शौर्यपूर्ण लाठी-काठी खेळांचे प्रात्यक्षिक श्री तन्मय नेऊरगावकर यांनी सादर सदर केले. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गौरी दहिभाते या विद्यार्थिनीने भावनिक कविता सादर केली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत गीत मिलिंद बुवा गोसावी व त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केले, “तन-मन हिंदू” हे गीतही सादर झाले.
दीपप्रज्वलन व भारतमातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक सेठ कारवा होते; मात्र त्यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष श्रीमती रचना ताई शिंगवी यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज जगताप यांनी केले. त्यानंतर श्री दिवाकर राव कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “पंच परिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन केले. पुढे श्री सुदर्शन महाराज कपाटे यांनी देशातील विविध सामाजिक प्रश्न, बदलता लोकसंख्येचा समतोल व हिंदू समाजासमोरील आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले.
यानंतर श्री भरत आमदापुरे यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी व सामाजिक मानसिकतेचा सखोल उहापोह केला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्रीमती रचना ताई शिंगवी यांनी केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शिवराज पारिख यांनी केले, तर श्री खर्डेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरीत्या “वंदे मातरम्” गायले गेले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शुभम खरात यांनी केले.
अशा प्रकारे पैठण येथील विराट हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या संमेलनासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment