शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अतिक्रमीत मशिदींवर तात्काळ कारवाईची करा

---Advertisement---

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांची प्रशासनाकडे मागणी

श्रीरामपूर : शहरात रामनवमी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणामुळे श्रीरामपूरातील वातावरण चांगलेच तापले असून या घटनेच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटनांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आदी संघटनांच्या वतीने तहसीलदार व प्रांतधिकारी यांना निवेदन देत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गोंधवणी येथून गेल्या सुमारे ५० वर्षांपासून निघणारी पारंपरिक ‘मानाची झेंडा’ मिरवणूक नेहमीप्रमाणे शहरातून मार्गक्रमण करत होती. मिरवणूक वॉर्ड क्रमांक २ परिसरात पोहोचली असता काही जिहादी व्यक्तींनी अचानक मशिदीच्या परिसरातून दगडफेक केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीत सहभागी भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली.

या दगडफेकीत तीन रामभक्तांसह एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती संघटनांच्या वतीने देण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळवले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण कायम असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनात संबंधित भागात वारंवार कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ज्या ठिकाणाहून दगडफेक झाल्याचा आरोप आहे ती मशिद अनधिकृत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी गोरक्षाप्रमुख ऋषिकेश भागवत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे किसन ताकटे, हिंदू महासभेचे राम यादव यांच्यासह विविध हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment