मुंबई : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २८ जानेवारीनंतर पक्षाचे कुठलेही पत्रव्यवहार वैध धरू नये, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्यध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता. आता या पत्रावरून प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाच्या घटनेत अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षालाही अधिकार देण्याच्या प्रस्तावाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं समाधान झालं नसल्याची माहिती समोर येत आहे.
मिळेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली होती. या बदलात कार्याध्यक्ष पदाला अधिक अधिकार देण्याचा प्रस्तावाचा समावेश होता. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र पाठवलं. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळला. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्ष करावे, अशी मागणी आयोगाकडे केली होती.
सुनेत्रा पवारांनी सूत्रे हलवली; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं? तर सुनील तटकरे यांनाही डच्चू








