शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

नारायण सुर्वे साहित्य संमेलनात कथालेखक काशिनाथ माटल स्वामीराज पुरस्काराने सन्मानित !

---Advertisement---


मुंबई– मुंबईतील स्वामीराज प्रकाशनच्या वतीने मराठी भाषा संवर्धनासाठी मागील काही वर्षांपासून”आठव दिवस” साजरा करण्याची संकल्पना राबविली गेली.त्याच कार्याचा एक भाग म्हणून प्रकाशनने ख्यातनाम साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २७ अणि २८ मार्च असे दोन दिवशीय सुर्वे मास्तर अध्याय दुसरे,साहित्य संमेलन,प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे लघु सभागृहात आयोजित केले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शुक्रवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले.या संमेलनामध्ये वयाची ८८ वर्षे नाट्यलेखन,दिग्दर्शन आणि अभिनय संपन्न के.राघवकुमार यांना संमेलनाचे अध्यक्ष केदार शिंदे यांच्या हस्ते,कै.बाबाजी धोंडू शेलार स्मृती,गिरण गावातील साहित्य जाबर,नारायण सुर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्याप्रसंगी स्वागताध्यक्ष गिरण गावातील नगरसेवक किरण तावडे होते.अभिनेते प्रमोद पवार,संस्थेचे सर्वेसर्वा रजनीश राणे आदी त्यावेळी उपस्थित होते.आपल्या सत्काराला उत्तर देताना के राघव यांनी आपल्या भाषणात आपली संघर्षमयी वाटचाल जिवंत केली.
संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गतील ज्येष्ठ साहित्यिक कै.कुमुद गजानन रेगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ,गिरणगावातून कथालेखक म्हणून नावारूपाला आलेले काशिनाथ माटल यांना नाटककार विजय टाकळे यांच्या हस्ते स्वामिराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले,कॉलेज जीवनात सुर्वे मास्तरांचे धडे गिरवता-गिरवता आज त्यांच्याच साहित्य संमेलनात आपल्याला पुरस्कार मिळत आहे,हा आपल्यासाठी अपूर्व योग आहे.माझे पाचही कथासंग्रह पुरस्कार प्राप्त ठरले असून,सामान्य माणसांचे भोग, स्त्रियांचे दुःख,माणसाची अवहेलना, हे सर्व माझ्या कथांचे विषय ठरले आहेत. करोना काळावर मी लिहिलेला “सावट”हा कथासंग्रह माझी खरी ओळख निर्माण करून गेला आहे. स्वामीराज प्रकाशनने कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्य संमेलनात गिरणगावातील कथाकार म्हणून माझी ओळख निर्माण केली आणि लिखाणात नवे बळ प्राप्त करून दिले आहे,असेही कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले.
या औचित्याने “गांधी टॉल्क” या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक किशोर बेळेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संमेलनात अनेक कलावंताचाही सन्मान करण्यात आला.
संमेलनात कवी अशोक नायगावकर,प्रा.अशोक बागवे,महेश केळुसकर,संतोष पवार,कपिल भोपटकर,सुभाष नकाशे, स्वप्नील राजशेखर,विवेक देशपांडे, बजरंग चव्हाण,हेमंत भालेकर,रविंद्र पांचाळ यांनी चर्चेत भाग घेत, नारायण मास्तर साहित्य संमेलन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment