चाकूर: अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक यंत्रसामुग्री एका संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करत असून लवकरच ही यंत्रसामग्री आपल्या सर्वांच्या सेवेत येणार असून, यामुळे अनेकांच्या आरोग्याचे निदान या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शंकरवाडी तालुका चाकूर येथे केले.
ते शंकरवाडी येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत दहा लक्ष रुपयाच्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा व स्व. नारायणराव चाटे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद सदस्य रंजना चाटे, सरपंच भालचंद्र चाटे, यांच्या वतीने देण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा उद्घाटन सोहळा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्ती कासले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे , उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रंजना चाटे, सरपंच भालचंद चाटे, प्राचार्य डॉक्टर धनंजय चाटे , अनिल वाडकर, यशवंतराव जाधव, राहुल सुरवसे, संदीप शेटे, मनोज पाटील,पंचायत समिती सदस्य गजानन होनराव, नरेंद्र हाक्के, प्रतिक केदार, काँमेश कसबे, बाळासाहेब जाधव, बसवराज गंगापुरे, श्रीनाथ सावंत, शैलेश कदम, डी के कासले, संदीप बाचपल्ले, आयडी शेख, रामचंद्र तिरुके, विश्वनाथ पाटील, नारायण काचे, नाथा मद्रेवार, शिवशंकर मुधाळे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की, मागील काळात लाईटचा मोठ्या प्रमाणात प्रश्न होता तो सोडवण्यास आपणा सर्वांना यश आलेला आहे . आता आज शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते हा महत्त्वाचा विषय असून शंकरवाडी भागातील सुद्धा असेच रस्त्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. शंकरवाडी हे गाव दुधासाठी प्रसिद्ध असून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज हव असेल तर त्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यांना कर्ज देऊ ,त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी त्यांनी दिलेल्या संधीचे त्यांनी सोनं करून लोक कल्याणासाठी काम करावे अशी अपेक्षा सुद्धा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल सुद्धा त्यांनी मतदारांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, धनंजय चाटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉक्टर भालचंद्र चाटे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी व आभार संतोष कोल्हे यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकरवाडी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.
लवकरच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध होणार: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील







