शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपूर-बेलापूर रस्ता बनलाय कचरा डेपो

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीरामपूर-बेलापूर रस्त्याला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिग असून यामुळे आजुबाजुच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बेपरवाईकडे कोणत्याही प्रशासनाचे लक्ष नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. श्रीरामपूर -बेलापूर रस्त्याच्या कडेला शहरातील व्यावसायिक व काही रहिवासी कचरा आणून टाकीत आहे.सदर रस्त्याचा श्रीरामपूर वेशीपासूनचा भाग बेलापूर हद्दीत येतो. त्यामुळे कचरा श्रीरामपूरचा आणि ञास बेलापूरला अशी अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिग आढळतात. यात प्लॕस्टीक कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही लोक कचऱ्याचे ढिग पेटवून देतात. यामुळे अशा ठिकाणची झाडे जळून जात आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही.बेलापूर ग्रामपंचायतीने गावाकडील रस्त्याचे भागातील कचरा वेळोवेळी उचलला जातो. पण श्रीरामपूर शहराच्या बाजुने कचऱ्याचे प्रमाण अधिक असून यांस नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबादार आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबःधित प्रशासनाने लक्ष द्यावे आणि अशाप्रकारे कचरा टाकण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या रस्त्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment