शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आमदार अमोल खताळ यांच्या “ज्ञानदान” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

---Advertisement---

शालेय साहित्याचे लवकरच होणार गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप

संगमनेर -गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणा साठी आमदार अमोल खताळ यांनी सुरू केलेल्या “ज्ञानदान” सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी मागील वर्षा प्रमाणे याही वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा उदात्त हेतू डोळ्या समोर ठेवून केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वह्या पेन, दप्तर, कंपास बॉक्स, पेन्सिल, पॅड रंग साहित्य इतर शालेय साहित्य भेट देत सामाजिक उपक्रमांनी जन्मदिवस साजरा करण्यात आला.
जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देण्या साठी कोणीही हार गुच्छ भेटवस्तू देण्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य देण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला तालुक्या तील त्यांच्या चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शालेय साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकी जपली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह व्यापारी, शिक्षक, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि सर्व सामान्य नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात साहित्य जमा केले आहे.या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यां च्या चेहऱ्यावर आनंद फुलणार असून आगामी शैक्षणिक वर्षात त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जमा झालेले सर्व साहित्य तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ पाटील जनसंपर्क कार्यालया कडून देण्यात आली.
दरम्यान, “ज्ञानदान” उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जाणीव निर्माण झाली असून शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याचा सकारात्मक संदेश या माध्यमातून दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेतल्यास अनेक कुटुंबांना आधार मिळू शकतो, अशी भावना नागरिकां मधून व्यक्त होत आहे. आमदार अमोल खताळ यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.


“समाजाने माझ्यावर प्रेम केले, त्याचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावला तर अनेकांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. समाजासाठी काही तरी सकारात्मक करण्याची प्रत्येकालाच संधी असते. ‘ज्ञानदान’ या उपक्रमा मुळे परिसरात सामाजिक जाणीव निर्माण झाली असून हीच खरी समाजसेवा आहे.”— अमोल खताळ, आमदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment