१९ गावांतील ५,५९९ शेतकऱ्यांना थेट लाभ; २,३७१.९२ हेक्टर क्षेत्रा वरील नुकसानीची भरपाई
संगमनेर :संगमनेर तालुक्यात मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा देत संगमनेर तालुक्यासाठी तब्बल ₹४ कोटी ३७ लाखांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक गावात मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेहोतेआमदार अमोल खताळ यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर केला होता या सर्व नुकसानीची महायुती सरकारने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला राज्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹१६४ कोटी .८३ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्या साठी ₹२५.कोटी २० लाखाची मदत जाहीर करण्यात आली असून यात संगमनेर तालुक्या साठी ₹४.कोटी३७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे संगमनेर तालुक्यातील १९ बाधित गावांतील ५,५९९ शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून, २३७१.९२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची महायुती सरकारने दखल घेऊन ही मदत दिली जात आहे. संकटाच्या अत्यंत कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीप्रमाणे ठामपणे उभे राहून त्यांना मोठा दिलासा देण्याचे काम शिवसेना महायुती सरकारने केले असून, त्यामुळे आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमित्रा पवार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले







