श्रीरामपुर : अन्न हा जीवनाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखे आहे. अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असे सांगितले आहे.
अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे याला अनसरून प पुज्य गुरुमाऊली व गुरुपुत्र दादासाहेब मोरे यांच्या अशिर्वादाने श्रीरामपुर शहर सेवेकरी व भाविकांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र दत्तधाम ( गाणगापुर ) व अक्कलकोट येथे शिधा साम्रगी नुकतीच पाठविण्यात शिघा सामग्रीत गहु, गुळ, सुर्यफुल तेल, व बटाटे या स्वरूपात सुमारे १६९१ किलो शिधा साम्रगी अन्नदाना साठी पाठविण्यात आली अशी माहिती जेष्ठ सेवेकरी सुमेर भाऊ राजपुत यांनी दिली. सहा वर्षीपासून सुरु असलेल्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
शिधा सामग्री साठी मोफत वाहतुक संदीप पाथरकर तसेच , मोफत टोल नाका व इंधनाचे सहकार्य शाशिभाऊ शिंदे, संगिता रासकर, राजु भवर, डॉ पडवलकर, विजयाताई, सुर्वणाताई, चोथेताई , घोलपकाका, परघुराम जगताप यांच्या कडुन लाभले . यावेळी युवराज भंडारी, निरज राजपुत, अनिकेत कुऱ्हे, प्रमोद भवर, किरण ताम्हाणे, उमेश गुळस्कर, संजय नगरकर, गणेश जोदारे, संदीप नवगिरे, दत्ता वाघचौरे, वैभव मैड, गणेश वडनेरे , राजेन्द्र लबडे, स्वप्नील घनवटे, बी आर शिंदे यावेळी उपस्थित होने
फोटो ओळ -
श्रीरामपुर - श्रीरामपुर शहर सेवेकरी व भाविकांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने श्रीक्षेत्र दत्तधाम (गांडगापुर) व अक्कलकोट येथे शिधा साम्रगी नुकतीच पाठविण्यात आली (छाया - रुपेश सिकची, श्रीरामपुर)







