पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर एका आठवड्यात २४तास वीजपुरवठा सुरळीत
संगमनेर : तालुक्यातील समनापुर गावातील पाणीपुरवठा योजनेला वेळोवेळी होणारा वीजपुरवठा खंडित होत होता. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे भर उन्हाळ्यात गावाला दररोज पाणी मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
समनापुर गावासह वाड्या-वस्त्यांवर आठ दिवस पाणी मिळत नव्हते. त्यामुळे पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत होते. यासंदर्भात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रणजित जाधव यांनी संगमनेर येथे झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत मंत्री विखे-पाटील व आमदार खताळ भाजप सरचिटणीस संपत गेठे यांच्यापुढे व्यथा मांडली होती. त्या नंतर मंत्री विखे-पाटील यांनी तातडीने महावितरण अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर समनापुरचे ज्येष्ठ नेते म्हतू शरमाळे, माजी सरपंच भाऊ साहेब शेरमाळे, रामनाथ केसकर, राजेंद्र गायकवाड, शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रणजित जाधव,भाजप तालुका सरचिटणीस संपत गेठे, समन्वयक सुनिल चांडे, राहुल पकळे, युवा सेना उपतालुकाप्रमुख एकनाथ शेरमाळे तसेच संदीप शेरमाळे, राजेश शेरमाळे
मेजर रावसाहेब शेरमाळे, , भागा शेरमाळे, मनोज भास्कर, मच्छिंद्र शेरमाळे, बापू दळवी आणि देवेंद्र साळवे यांच्या सह ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय रोडे यांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस बंदोबस्तात पाईपलाईन योजनेचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे पाणीपुरवठाही नियमित सुरू झाला आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला यापूर्वी केवळ सहा तास वीजपुरवठा होत होता. त्यामुळे सात ते आठ दिवसांनंतर एकदाच पाणी येत होते. या गंभीर बाबीची दखल घेत पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा.व आमदार अमोल खताळपा. यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी निंबाळे शिवारातून जात असणार्या समनापुर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा २४ तास सुरू राहावा यासाठी युद्धपातळीवर काम केले अन अवघ्या एकाच आठवड्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत केला.
पाणीपुरवठा योजनेसाठी असणारा वीज पुरवठा २४ तास सुरू झाला आहे.त्यामुळे आता गावातील वाडी-वस्त्यांवर दररोज पाणीपुरवठा होत आहे. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून सुटल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.







