शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

---Advertisement---

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात यानेही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले.

अशोक खरात याला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment