शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गोंधवणी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

---Advertisement---

पाळीव कुत्री फस्त; ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी परिसरातील धार्मिक जागृत देवस्थान भैरवनाथ बन तसेच दिघे वस्ती या ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्री अप रात्री वस्तीवर दबा धरून बसणे तसेच पाळीव कुत्र्यांना उचलून घेऊन जाणे यामुळे परिसरातील नागरिक हैरान झाले आहेत. या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोंधवणी येथील भैरवनाथ बन शेजारी असलेले बर्वे वस्ती या ठिकाणी बिबट्याने चार ते पाच दिवसांमध्ये दोन ते तीन कुत्री फस्त केली आहे. या ठिकाणी एक मोठी लोक वस्ती असून गाई, म्हशी, घोडे, शेळी, बोकड असे विविध प्रकारचे प्राणी या ठिकाणी बर्वे परिवार सांभाळ करत आहे. काही दिवसापासून या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याने लहान मुले तसेच परिवारातील सदस्य अतिशय भयभीत झाले आहेत.तसेच विजेचा लपंडाव असल्याने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली समोरच काही अंतरावर दिघे वस्ती असून या ठिकाणी देखील बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दिघे, चांगदेव महाराज लबडे, विलास मस्के, गोरक्षनाथ बर्वे, रमेश बर्वे, सचिन सूर्यवंशी, सुरेश गोराणे, धोंडीराम लबडे, आदींनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तरी लवकरात लवकर संबंधित विभागाने दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा बाळासाहेब दिघे यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment