शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

बदलत्या वातावरणात जल व्यवस्थापनावर भर देण्याची गरज – शैलेश देशमुख

---Advertisement---

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर“जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६ शैतकरी कार्यशाळा

बाभळेश्वर : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. “पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती” हा मूलमंत्र लक्षात ठेवून प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर चे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे जलसंपदा विभाग आणि राहाता तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर“जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६” निमित्ताने पिक पद्धतीत बद्दल, उत्पादकता वाढ तसेच पाण्याचे नियोजन आणि जलसंवर्धन याविषयी आयोतित शेतकरी कार्यशाळेत देशमुख बोलत होते. यावेळी राहाााता कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रजनीकांत कवडे, श्रीरामपूरचे शाखा अभियंता संजय कल्हापुरे, केंद्रातील शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, डॉ. विलास घुले डॉ. प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे, डॉ. विठ्ठल विखे, शाखा अभियंता
सिद्धांत शिंदे यांच्यासह जलसंपदा, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांनी ठिबसिंचन, तुषार सिंचन, पिकनिहाय पाणी व्यवस्थापन, मृद व जलसंधारण उपाययोजना, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत असताना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीमध्ये कसा जिरेल आणि पाणी पातळी कशी वाढेल यासाठी सर्वांनी
पाणी जमिनीत जिरण्यासाठी जलतारा तंञाचा एकत्रित प्रयत्न करावा त्याचबरोबर जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा जलजागृृृृती याञा २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीमध्ये होत आहे यामध्यै सक्रिय सहभाग सहभागी व्हावेत रविवारी जलजागती याञाचे आगमन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होत आहे. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जलव्यवस्थापनामध्ये सर्वांनी आपला सक्रिय सहभाग देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. विलास घुले,शांताराम सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रियंका खर्डे यांनी तर आभार रजनीकांत कवडे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment