शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

माऊलीने दिला हरवलेल्या चिमुकल्यांना आधार

---Advertisement---


श्रीरामपूर : वनीकरणात हरवलेल्या दोन चिमुकल्यांना मायेचा हात मिळताच त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण उजळला. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव शिरसगाव परिसरामध्ये पाच ते सहा दिवसापूर्वी लहान मुलगी सोनी (वय ५ वर्ष) तसेच लहान मुलगा चंदू (वय ( २ वर्ष ) हे दोघे वनीकरणात फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहिती दिली यावेळी अशोकनगर पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत सदर मुलाविषयी चौकशी केली तसेच मुलांसंदर्भात माहिती वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत सदर मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेणे विषयी माहिती दिली. परंतु मुलांचे आई-वडील दोघांना वनीकरणात सोडून फरार झाल्याने राजेंद्र देसाई यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने येथील माऊली वृद्धाश्रम येथे आणण्यात आले. तसेच या ठिकाणी मुलांना आंघोळ तसेच नवीन वस्त्र देऊन त्यांना चहा दुध बिस्किट अल्पहार देण्याचा आला. साधारण चार ते पाच दिवस मुले व्यवस्थित राहिल्याने शोध घेत आई व वडील या ठिकाणी भेट देण्यासाठी आले. परंतु दोन्ही मुलांनी आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिला.
मुलाचे वडील गजानन पाटील तसेच आई अनिता पाटील हे हतबल झाल्याने मुलांना आश्रमात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. चार ते पाच दिवसात मुलांचे संगोपन तसेच पालन पोषण आहार चांगल्या पद्धतीने झाल्याने मुलांनी आई वडिलांना नकार दिला.
त्यामुळे माऊली आश्रमाचे अध्यक्ष सुभाष वाघुंडे तसेच सचिव कल्पना वाघुंडे व्यवस्थापक दत्तात्रेय खिलारी, दिलीप गिरमे, शुभम नामेकर मुलांविषयी आदरभाव निर्माण करून संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी मुलांच्या आई-वडिलांनी राजेंद्र देसाई तसेच माऊली वृद्धाश्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व्यवस्थापन यांचे आभार व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment