शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शरणपूर वृध्दाश्रमात मारुती मंडळातर्फे आरोग्य सुविधेचा उपक्रम

---Advertisement---

सोनई : सोनई येथील मारुती मित्र मंडळातील जेष्ठ सदस्य पांडव शाम पुरी (वय-८४) व सेवानिवृत्त शिक्षक भानुदास धुमाळ (वय-८१) यांच्या वाढदिवसानिमित्त परिवारातील सदस्यांनी अनावश्यक खर्चास फाटा देऊन फत्तेपुर (ता.नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमात आवश्यक सुविधा व ३२ स्त्री-पुरुष वृध्दांची आरोग्य तपासणी केली. सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी वृध्दाश्रम विषयी माहिती दिली. उपाध्यक्ष बाळासाहेब मुटकुळे, व्यवस्थापक संतोष मगर सचिव सुरेखा मगर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबासाहेब शिरसाठ यांनी सर्व वृध्दांची तपासणी करुन मोफत औषधांचे वाटप केले. अध्यक्षस्थानी अमृतराव काळे होते. भाजपाचे उपाध्यक्ष रामचंद्र खंडाळे, आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, डाॅ. शिरसाठ, पुरी साहेब, भानुदास धुमाळ यांचे भाषण झाले. चंद्रकांत आघाव, शरद लिपाने, आसाराम बोरुडे, दगडू कदम उपस्थित होते. पुरी कुटुंबाने वृध्दाश्रमातील सुविधांसाठी देणगी दिली तर अमृतराव काळे यांनी पंखे देण्याचे मान्य केले. कारभारी शिकारे यांनी सुत्रसंचालन केले. निलेश गोसावी यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment