श्रीरामपूर : सध्या भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु आहे त्याला जोडूनच शेतीचे आवर्तन सोडा अशी मागणी श्रीरामपूर – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चालू आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी आहे त्यामुळे नमूना ७ भरण्यासाठी मुदतवाढ देऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचे आवर्तन होणे गरजेचे आहे.
मागचे शेतीचे आवर्तन होऊन जवळपास ३५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे शेती करिता पाण्याची गरज भासत आहे. साधारणतः उन्हाळ्यात ३० ते ३५ दिवसांनी शेतीचे आवर्तन होणे क्रम प्राप्त आहे. पिण्याच्या पाण्याचा आवर्तना सोबत शेतीचे आवर्तन घेतल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होणार आहे.
शेतीचा विज प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक रोहित्र जळालेले आहे शेतीचा वीजपुरवठा देखील १ तासाने कमी केलेला आहे. वीज आहे तर पाणी नाही पाणी आहे तर वीज नाही आशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
सध्या धरणात देखील मुबलक प्रमाणात पाणी साठा आहे त्यामुळे त्यामुळे तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा विभागाकडे केली आहे.
पिण्याच्या पाण्याला जोडून शेतीचे आवर्तन सोडा : आमदार हेमंत ओगले







