उक्कलगाव, कारेगाव येथे भाजीपाल्यासह डाळींब पिकांचे नुकसान
श्रीरामपूर : वादळी वाऱ्यासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.परिसरात प्रचंड गारांचा पाऊस पडला.त्यामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती.रविवारी (दि.३१ ) मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती.काही तर, गावात गारपीट झाली.या गारपीटीने रब्बी पिकांचे भाजीपाला मोठे नुकसान झाले. गोदा पट्ट्यातील जाफराबाद, सरला, गोवर्धन, रामपूर तसेच प्रवरा पट्ट्यातील गळनिंब, फत्याबाद, उक्कलगाव, बेलापूर खुर्द, बेलापूर बुद्रुक, पढेगाव, मातापूर, कारेगाव आदी गावांसह परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी स्वरूपाच्या या पावसामुळे शेतीपिके, भाजीपाला तसेच फळबागांना फटका बसला असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्याने विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, गळनिब, या गावासह, राहूरी तालुक्यातील आंबी, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, गंगापूर, आदीसह गावात मे महिन्यात शेवटच्या क्षणी अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली होती.यात गारांचा साधारणता अंदाजे गोटी एवढया गोल गारा पडल्या आहेत.अवकाळी पावसाने मे महिन्यात शेवट क्षणाला दणका दिला.जून महिन्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.काहीच भागात डाळिंबसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरवला आहे.आधीच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, त्यात काढणीला आलेल्या पिके हातातून निघून जात आहेत.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहेत.त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चढाओढीनंतर परिसरातील वातावरणात अचानक मोठा बदल झाला.शहरासह ग्रामीण भागाचे तापमान ४२ अंश.से.नोंद झाली असून, उक्कलगाव, संक्रापूर,केसापूर, एकलहरे,आंबी, या प्रवरा परिसरात तर पावसाने जोरदार अक्षरशः बॅटिंग केली आहे.मात्र पुढील ४८ तास जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, वादळी वाऱ्यासह गारपिटीची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहेत.एप्रिल – मे महिन्याच्या सुरुवातीलाच उक्कलगावकरांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच अनुभव आला आहेत.या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला असला तरी काही ठिकाणी चाळींवरील बारदाणे अथवा संरक्षणात्मक आच्छादन पूर्णपणे करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाचे पाणी कांद्यामध्ये शिरून मोठ्या प्रमाणात कांदा भिजल्याच्या घटना घडल्या. यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरण्याची तसेच साठवणुकीदरम्यान कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.याशिवाय भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून फळबागांमधील फळगळ वाढली आहे.अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराजावर या अवकाळी पावसाने आणखी एक संकट कोसळले असून आगामी हंगामाच्या तयारीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे……
देवळाली प्रवरा श्रीरामपूर ररत्यावरील नरसाळी शिवारात वादळी वाऱ्याने लिंबाचे झाड ररत्यावर कोसळले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. राहूरी जाणारे वाहतूक उक्कलगाव – कोल्हार मार्गे राहूरी – अहिल्यानगरकडे वळवली होती. रविवारी सांयकाळी झाड काढण्याचे प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते.







