शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; युवानेते जय पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

---Advertisement---

बारामती – मतदारसंघातील ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री जय दादा अजित दादा पवार यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील आणि शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल. तसेच, या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्रा वहिनीसाहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.या भेटीदरम्यान स्थानिक शेतकरी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment