पुणे : पुरुष आयोगाची स्थापना होणे काळाची गरज आहे कारण आत्ताचे कायदे हे एक प्रकारे महिलावादी असल्याने कौटुंबिक वादाला खतपाणी घालत असल्याने सध्या पत्नीपीडित पुरुषाचे प्रश्न हे केवळ वैयक्तिक राहिले नसून ते पुढील पिढ्यांना हानिकारक आहे. कौटुंबिक संस्था धोक्यात आणत राष्ट्राचे सुद्धा मोठे नुकसान करत असून समाजासाठी हे एक गंभीर आव्हान ठरत आहे त्यामुळे पुढे देशाचे समाजाचे काय होईल सांगता येत नाही अशी चिंता व्यक्त करत पत्नीपीडित पुरुषाने आपल्या हक्कासाठी एकत्र येत संघर्षाचा नवा ध्यास घेतल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. असे प्रतिपादन समाजभूषण साहित्यिक उत्तमराव तरकसे यांनी येथे केले.
स्वारगेट पुणे मधील श्री गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या हॉलमध्ये पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीने पत्नीपीडित पुरुषांना कायदेशीर मार्गदर्शन ,भावनिक आधार देण्याकरिता व सामाजिक जनजागृती होण्याकरिता राज्यस्तरीय एकदिवसीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
सदर मेळाव्यात फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. संकेत दाभाडे, उपाध्यक्ष तुषार भोसले तसेच समाजभूषण उत्तमराव दासू तरकसे आसरडोहकर उपस्थित होते. त्यांनी पत्नी पीडित पुरुषांना मार्गदर्शन केले.
उत्तमराव तरकसे पुढे म्हणाले, इथून पुढे कोणत्याताही पत्नीपीडित पुरुष आत्महत्या करणार नाही एव्हाना कोणत्याही पुरुषाला आत्महत्या करू देणार नाही तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, कोणालाही जाऊ देणार नाही अशी उपस्थितांना प्रतिज्ञा करण्यास सांगत आपण आपले हक्क संविधानिक मार्गाने घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
1) पुरुष आयोगाची स्थापना लवकरात लवकर करावी 2) चीन देशाच्या धरतीवर खावटी मिळण्याचा कायदा अमलात आणावा 3) महिला संरक्षण विषयक बनवलेल्या कायद्यात म्हणजे डी व्ही 498,25 यासारख्या कायद्यात बदल करावा 4) स्त्री पुरुष समान कायदा करावा अशा शासनाकडे मागण्या करत काळानुरूप कायद्यात बदल होणे गरजेचे आहे असेही तरकसे म्हणाले.
सदर मेळावा हा पूर्ण दिवसभराचा होता. राज्यातील विविध जिल्ह्यातून तब्बल 1000 ते 1200 पत्नीपीडित पुरुषाने आपल्या हक्कासाठी एकत्रितपणे आवाज बुलंद केला एडॅ संकेत दाभाडे व तुषार भोसले यांनी उपस्थितात्यांना कायदेशीर मार्गदर्शन करत पत्नीपीडित पुरुषाला भेडसवणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यातून न्याय मिळवण्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत योग्य कायदेशीर मार्गदर्शन केले.
पुरुष आयोग स्थापन करणे काळाची गरज – उत्तमराव तरकसे







