प्रलोभन दाखवुन धर्मांतर करणे चुकीचे
मुंबई – स्वइच्छेने धर्मांतर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हिंदु धर्मातील व्यक्तीला जर ख्रिश्चन, बौध्द, मुस्लिम व्हायचे असेल तर तो होवु शकतो आणि मुस्लिम धर्मियाला जर हिंदु व्हायचे असेल तरी तो स्वइच्छेने धर्मांतर करु शकतो. मात्र बळजबरीने , जबरदस्तीने प्रलोभन दाखवुन धर्मांतर करणे चुकीचे आहे. संविधानाने सर्व धर्मीयांना समान अधिकार, समान न्याय दिला आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.राहुरी तालुक्यातील कनघर या गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या झालेल्या जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी कनगर ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सौ सीमाताई आठवले यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, कनगर गावचे सरपंच सर्जेराव गाडगे, रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक नेते गोविंदराव दिवे, प्रकाश नाना साळवे, भाष्कर गाडे, राजेंद्र दिवे, भाऊसाहेब दिवे, रिपब्लिकन पक्षाचे नेते काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, अशोकराव गायकवाड,, राजा कापसे, विजय बनसोडे, सुनिल साळवे, भिमा बहादुर, आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.







