शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भोंदू अशोक खरात प्रकरणातील व्यवहारांची ईडी चौकशी होणार

---Advertisement---

मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य

नाशिक : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजलं आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरात प्रकरणाबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी स्पष्ट सांगतो की अशा प्रकरणाबाबत सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment