शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

डॉ. आंबेडकर एक महान विचारवंत – अभिजीत क्षीरसागर

---Advertisement---


श्रीरामपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत होते. त्यांचे लेखन साहित्य विपुल आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा आणि धर्म या सर्व विषयांवर लेखन करून विचारवंतामध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म, रुपयाची समस्या, जातीचा विनाश या ग्रंथांमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत होते, असे प्रतिपादन भि.रा. खटोड कन्या विद्यालयाच्या शालेय समितीचे सदस्य श्री. अभिजीत क्षीरसागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री. दत्तात्रय साबळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार व कार्याचे आपल्या जीवनात आचरण आवश्यक आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी ज्युनिअर कॉलेजच्या चेअरमन डॉ. सौ. रिमा गोसावी, श्री. कय्युम शेख, प्राचार्या डॉ. मंगला भोसले, पर्यवेक्षिका सौ. अनिता शिंदे, प्रा. आदिनाथ जोशी, प्रा. विनायक कुलकर्णी, प्रा. सतीश म्हसे, श्री. चंद्रकांत शिंदे, श्री. नवनाथ जंगले, श्री. कैलास आढाव, श्री. मधुकर पवार, श्रीम. शितल गुंजाळ, श्रीम.निर्मला लांडगे, सौ. शुभांगी गटणे ,सौ. सोनाली पुंड, सौ. पूजा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व सेवकवॄंद यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment