सोनई : नेवासा तालुक्यातील धनगरवाडीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न असलेल्या कृषि महाविद्यालय, सोनई मधील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषिकन्यांचे ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत आगमन झाले आहे.यावेळी यशश्री दरंदले, गायत्री आंबिलवादे, गायत्री लांडे,तनुष्का मोरे,संतोषी घुमरे, गौरी लांबेआदी कृषिकन्यांचे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी स्वागत केले आले.प्राचार्य डॉ.हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनुप दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ दिशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दहा आठवड्याच्या कालावधीत ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम, गावातील पीक पद्धती, आधुनिक शेती, शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, किड रोग नियंत्रण याविषयी कृषिकन्या शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी धनगरवाडीचे सरपंच सुनिल विरकर, जालिंदर विरकर, अप्पासाहेब विरकर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
धनगरवाडी ग्रामस्थांनी केले कृषिकन्यांचे स्वागत







