शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भगवान शंकर व पार्वतीचा अनोख्या विवाह सोहळ्याने भाविक भारावले

---Advertisement---

खांडगावला शिवपुराणकथेत महिलां व तरुणींनी खेळल्या फुगड्या

संगमनेर : शुभमंगल सावधान या मंगलाष्ट काच्या स्वरात आणि अक्षताच्या शुभ वर्षांमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभविवाह भक्तीमय वातावरणात पार पडला. गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव पुराण महाकथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.शंकर-पार्वतीच्या विवाह सोहळ्याने उपस्थित सर्वजण भारावून गेले संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील ओम इच्छापूर्ती कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सात दिवसमनोहर महाराज शिनारे यांच्या संगीत मय व रसाळ वाणीतून शिवपुराण महमहाकथा आयोजित करण्यात आली होती या कथेमध्ये सिनारे महाराजांनी गेली तीन दिवसापासून भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीच्या विविध लीलांचे प्रभावी दर्शन भाविकभक्तांना घडले. अजून चार दिवस खांडगाव करांना शिवपुराण महाकथा श्रावण करण्याची संधी मिळणार आहे या शिवपुराणकथेमध्ये शंकर पार्वतीचा विवाह सोहळा एक आगळे वेगळे आकर्षण ठरले विशेष भगवान शंकर म्हणून पांडुरंग बालोडे यांचे चिरंजीव अनिकेत व माता पार्वती म्हणून शिवाजी गुंजाळ यांची कन्या सपना या शंकर-पार्वती यांचा शुभ मंगल सावधान सोहळा मंगलाष्टकां च्या स्वरात,व अक्षतांच्या शुभवर्षावा मध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला यावेळी आ.अमोल खताळ यांनी शुभाशीर्वाद दिले त्यानंतर कथास्थळी जोरदार फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवत हर हर महादेवचा जयघोष केला तर महिला तरुणींनी फुगडी खेळण्याचा तसेच महिला पुरुषांनी नाचण्याचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण परिसरा मध्ये भक्ती, शक्ती आणि श्रद्धा याचा तिहेरी संगम झाला होता.चौकट खांडगाव येथे सुरू असलेल्या शिव पुराण महाकथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला आहे , या महाकथेसाठी येणाऱ्या परिसरातील भाविकांसाठी दररोज आमटी-भाकरी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असून, या महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत.

भगवान शंकर आणि माता पार्वतीचा हा विवाह सोहळा केवळ काल्पनिक कथानक न वाटता प्रत्यक्ष एखाद्या शुभमंगल विवाहसोहळया सारखाच होता. विशेष म्हणजे शंकर पार्वती झालेले सपना आणि अनिकेत हे दोघे ही १९ जून२०२६ ला विवाह बंधनात अडकणार होते. परंतु त्या अगोदरच शंकर-पार्वतीच्या रूपाने त्या दोघांवर अक्षदाचा शुभवर्षाव झाला आणि मंगलाष्टकाच्या स्वरामध्ये शुभमंगल सोहळा पार पडला हा एक योगायोग म्हणावा लागेलचौकट सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अध्यात्माची नितांत गरज निर्माण झाली आहे. अशा काळात सुरू असलेल्या शिव पुराण महाकथेच्या माध्यमातून भाविकांना नवचैतन्य, मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळत आहे अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, दिंडी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम या महाकथेच्या माध्यमा तून होत आहे. श्री अमोल खताळ पाटील आमदार संगमनेर विधानसभा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment