शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जीवघेण्या खड्ड्यावर ढापा कधी बसविणार तातडीने गटार दुरुस्त करा; नागरिकांची मागणी

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर हॉटेल सिद्धार्थचा कोपऱ्यावर गटारीचे काम सुरू केले असून त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. पाच ते सहा दिवसापासून काम बंद असून हा जीवघेणा खड्डा असाच काही दिवस राहिला तर या खड्ड्यात नक्कीच बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खड्ड्यावर ढापा बसवून गटारीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या गटारीची खूपच दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर नाल्यासारखे डबके साचले जाते. त्यामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली जाते. त्यामुळे तेथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे हा खड्डा संगमनेर रोडच्या मधोमधच असल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. पायी चालणाऱ्यांना तर कसरतच करावी जगते त्यामुळे येथील व्यावसायिक खूपच त्रासले असून या खड्ड्यांचे व जातीचे काम तातडीने करावे, अशी मागणी या भागातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे.
या खडयाविषयी अनेकवेळा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. आता नवनिर्वाचित सदस्य, नगराध्यक्ष पालिकेत कार्यरत आहेत त्यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment