चाकूर: स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे देशाला, राज्याला स्वातंत्र्य मिळाले यात स्व. बळीरामजी सोनटक्के यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान महत्वपुर्ण होते, त्यांचे मुक्तीसंग्रामातील योगदान चाकूरकर कधीही विसरणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले.
स्वातंत्र्यसैनिक स्व. बळीरामजी सोनटक्के (वय १०१) यांचे दुःखद निधन झाल्यानंतर चाकूर येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शोकभावना व्यक्त केली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन भातलवंडे, तहसीलदार नरसिंग जाधव, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे उपस्थित होते. त्यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की स्वातंत्र्य सैनिक बळीरामजी सोनटक्के यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी योगदान चाकूरकर काय मराठवाड्यातला कुठलाही व्यक्ती विसरू शकत नाही त्याचबरोबर त्यांनी नुकतीच शंभर वी पार केली होती त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेच तडजोड केली नाही व आरोग्याची कायम काळजी घेतली. यांच्या निधनाने एक सच्चा स्वातंत्र्य सैनिक चाकूर तालुक्याने गमावला आहे. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
स्व. बळीरामजी सोनटक्के यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान चाकूरकर विसरणार नाहीत: सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील







