मुंबई : केंद्र सरकारने सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध डावलून ३८ कामगार कायदे मोडीत काढुन कामगार विरोधी “चार कामगार संहिता “मंजूर केल्या.त्याच्या कार्य वाहीसाठी केंद्र सरकारने आज (१ एप्रिल)आधिसूचना जारी केली आहे.त्या विरुद्ध सर्व केंद्रीय कामगार संघटना संयुक्त लढा समितीने जाहीर केल्याप्रमाणे,आज राष्ट्रीय मिल संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि महाराष्ट्र इंटकच्या नेतृत्वाखालील विविध कारखाने, बंद गिरण्यांमधील लाखो कामगारांनी आज काळी फीत बांधून केंद्र सरकार विरुद्ध काळादिन पाळला आहे. त्यामध्ये मुंबईतील बंद पोदार,टाटा, इंदू क्रमांक ५,दिग्विजय या बंद गिरण्यातील कामगारांनी गेटवर,तर चाकण, औरंगाबाद-वाळूंज, रत्नागिरी, रायगड,नवी मुंबई,नाशिक आदी ठिकाणच्या कारखान्यामधील कामगारांनी काळ्या फिती लावून सरकार विरुद्ध घोषणा दिल्या.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, तसेच महाराष्ट्र इंटक,रा.मि.म.संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,यांनी आजच्या यशस्वी आंदोलनाबद्दल कामगारांचे अभिनंदन केले आहे.जोपर्यंत कामगार विरोधी चार कामगार संहिता केंद्र सरकार मागे घेणार नाही,तोपर्यंत यापुढे कोणत्याना कोणत्या रूपाने लढा चालूच राहील,असा निर्धारही कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे..
केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज सर्व उद्योग धंद्यात काळादिन!








