शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

पद्मभूषण स्व. करमसीभाई सोमैयांचे जन्मस्थळी स्मारक उभारावे : राजेंद्र लांडगे

---Advertisement---

श्रीरामपूर – साखर उद्योगात क्रांती करणारे पद्मभूषण स्व. करमसी सोमैया यांचा मालुंजे बु. सारख्या खेड्यात जन्म झाला.दरम्यान इंग्रज राजवटीचे सावट असतानाही इच्छाशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्व. करमसी सोमैया यांनी खाजगी साखर उद्योगासह शैक्षणिक, आरोग्य,पर्यावरण, धार्मिक क्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने मरणोत्तर पद्मभूषण स्व. करमसीभाई सोमैया यांना जाहिर करून गौरविण्यात आले.स्व. सोमैया यांचे अलौकिक कार्याची नवीन पिढीला ओळख झाली पाहिजे. यासाठी जन्मस्थळी मालुंजे बु. येथे पद्मभूषण स्व. करमसीभाई सोमैया यांचे भव्य स्मारक उभारावे असे सामाजिक भावनेतून श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आणि पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे प्रतिपादन केले.पद्मभूषण स्व. करमसीभाई सोमैया यांचे भव्य स्मारक जन्मस्थळी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मालुंजे बु. ग्रामपंचायत सरपंच अच्युत बडाख यांनी जाहिर केले. यावेळी सोसायटी चेअरमन नानासाहेब बडाख, जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब बडाख, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती बडाख, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बडाख ह,भ,प, अमोल महाराज बडाख, सोपान बडाख, संजय बडाख, दत्तात्रय भालेकर, पांडुरंग रिंगे, पत्रकार आबासाहेब कुमावत, बाळासाहेब जाधव,वसंतराव बडाख,अंनत परदेशी, रघुनाथ राऊत बापूसाहेब जाधव, संपत जाधव,बाळासाहेब परदेशी, अर्जुन बडाख, मेजर जालीदंर बडाख, वसंत बडाख, संपत जाधव, भास्कर बोऱ्हाडे, नरेंद्र रिंगे, भाऊसाहेब शिंदे,गणेश डावरे, राहुल काळे, पोपटराव बोरूडे गोरक्षनाथ बडाख, यशवंत बडाख,सचिन बडाख,सोपान भागवत बडाख, लक्ष्मण राऊत, अशोक बडाख, सर्जेराव भारस्कर, ठकसेन बर्डे, अशोक बडाख इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्तविकात राजेंद्र लांडगे म्हणाले, जसे कर्म भूमीला महत्व दिले जाते, त्याच तुलनेत जन्मभूमीला देखील महत्व दिले पाहिजे. स्व. सोमैया यांचे कार्य राज्यासह परराज्यात देखील सर्वश्रुत आहे. भारत देशातच अशा कर्तृत्वान व्यक्तींची मृत्यू नंतरही सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. हाच आदर्श अंगीकृत करूनधावपळीच्या युगात प्रत्येक युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची आवश्यकता आहे. याच तत्वानुसार करोना काळापासून उदात्य भावनेतून पद्मभूषण स्व. करमसीभाई सोमैया यांचे मालुंजे बु. जन्मस्थळी जयंती अभिवादन कार्यक्रम करण्यास सुरुवात केली असल्याचे लांडगे यांनी शेवटी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment