शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांची जागतिक स्तरावरील संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या जागतिक क्रमवारीत डॉ. ए. एस. सय्यद यांचा ८१ वा क्रमांक

---Advertisement---


कोपरगाव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीए, येथील पाच प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्तरावर मानांकन प्राप्त केले आहे. ‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या टॉप १००० स्कॉलर रँकिंगमध्ये महाविद्यालयातील डॉ. ए. एस. सय्यद, डॉ. भारती एम. शिंदे, डॉ. रितेश के. पटेल, डॉ. नवीन कुमार आणि विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. दीपेश बी. परदेशी यांनी विविध संशोधन क्षेत्रांत स्थान मिळविले आहे. या यशामुळे संजीवनीच्या संशोधनाभिमुख शैक्षणिक वाटचालीला जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण ओळख मिळाली आहे.
या सर्वांच्या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांना सर्वांचे अभिनंदन केले तर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते उपस्थित होते.
या मानांकनात डॉ. ए. एस. सय्यद यांनी स्ट्रक्चरल अ‍ॅनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन या संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर ८१ वा क्रमांक मिळविला असून त्यांचा इम्पॅक्ट स्कोअर ९५. ३७ आहे. त्याच संशोधन क्षेत्रात डॉ. भारती एम. शिंदे यांनी ९०. ०१ इम्पॅक्ट स्कोअरसह जागतिक स्तरावर ६१६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
डॉ. नवीन कुमार यांनी पावडर मेटलर्जी टेक्निक्स अँड मटेरियल्स या क्षेत्रात जागतिक स्तरावर १८५ वा क्रमांक मिळविला असून त्यांचा इम्पॅक्ट स्कोअर ६७. ५८ आहे. विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. दीपेश बी. परदेशी यांनी आयओटी आधारित स्मार्ट होम सिस्टिम्स या संशोधन क्षेत्रात ८२. ६१ इम्पॅक्ट स्कोअरसह जागतिक स्तरावर २९२ वे स्थान प्राप्त केले आहे. तसेच डॉ. रितेश के. पटेल यांनी कस्टमर सव्र्हिस क्वालिटी अँड लॉयल्टी या संशोधन क्षेत्रात ७३. ९२ इम्पॅक्ट स्कोअरसह जागतिक स्तरावर ८६७ वा क्रमांक मिळविला आहे.

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर मिळविलेले मानांकन ही संपूर्ण संजीवनी परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून, संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी ज्ञाननिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे. प्राध्यापकांच्या संशोधनाला जागतिक स्तरावर मिळणारी मान्यता विद्याथ्र्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यास प्रेरक ठरते. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रवाहाशी जोडणे, तसेच संशोधनातून देशाच्या प्रगतीत योगदान देणारे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ घडविणे, हे संजीवनीचे ध्येय आहे. प्राध्यापकांच्या या यशामुळे संस्थेची संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल आणि भविष्यात जागतिक स्तरावर ठसा उमटविणारे संशोधन घडेल, असा मला विश्वास आहे. -श्री अमित कोल्हे (प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment