शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

होम मिनिस्टर कार्यक्रमात पाणी वाचवावर महिलांमध्ये जनजागृती

---Advertisement---

श्रीरामपूर- विघ्नहर्ता महिला मंडळाच्यावतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात दुष्काळजन्य परिस्थितीवर पाणी वाचवा यावर महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
विघ्नहर्ता महिला मंडळाच्यावतीने कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात मोरगे वस्ती परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध निवेदक प्रवीण जमधडे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
विघ्नहर्ता महिला मंडळाच्यावतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने मोरगे वस्ती परिसरातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार हेमंत ओगले, उपनगराध्यक्ष कांचन सानप,माजी सभापती वंदना मुरकुटे, निती ओगले,नगरसेवक योगेश जाधव , नगरसेविका योगिता नागले,आशा परदेशी,वैशाली पोटे,रुपाली भागवत,त्रिवेणी गोसावी ,ज्योती जाधव,निलेश नागले यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला उपस्थित होते.
यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या व यामध्ये विजयी झालेल्या महिलांना मोठ्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले.तसेच कृष्णा कलेक्शन यांच्यावतीने १० विजेत्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत ओगले,योगेश जाधव,निती ओगले,योगिता नागले,रुपाली भागवत यांनी दुष्काळजन्य परिस्थितीवर पाणी वापर काटकसरीने करावे याचे आवाहन केले. उपस्थित काही महिलांनी कमीत कमी पाणी वापर कसा करावा याबाबत सूचना केल्या.यावेळी आभार नगरसेविका योगिता नागले यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

महाराष्ट्र-मलेशिया दरम्यान व्यापक परस्पर सहकार्य – मंत्री रावल

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे तातडीचे निर्देश!

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांची जागतिक स्तरावरील संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या जागतिक क्रमवारीत डॉ. ए. एस. सय्यद यांचा ८१ वा क्रमांक

महात्मा फुले कृषि विद्यापीठात भरडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

बेलापूर भाजप व वीर सावकर मित्र मंडळाकडून विविध शाळामध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम

बालाजी देवस्थान ट्रस्टच्या दानपेट्यांतील रकमेची मोजदाद; निरीक्षणाखाली प्रक्रिया पूर्ण

Leave a Comment