येवला शहराच्या पाणीपुरवठ्याला मिळणार नवी बळकटी- मंत्री छगन भुजबळ
नाशिक – येवला शहराच्या वाढत्या लोकसंख्येची आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या १६० कोटी २५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी बळकटी मिळणार आहे. या योजनेचे नियोजन सन २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून करण्यात आले असून, शहराला सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते आज महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान येसगाव येथील साठवण तलावात आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते स्व.नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, अरुणमामा थोरात, संभाजी पवार, डॉ.शेफाली भुजबळ, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, भोलाशेठ लोणारी, हुसेन शेख, भाऊसाहेब भवर, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष दत्ता निकम, मोहन शेलार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, पाणीपुरवठा सभापती चैताली सचिन शिंदे, नगरसेवक प्रवीण बनकर, छाया क्षीरसागर, लक्ष्मीबाई साबळे, गोटू मांजरे, अमजद शेख, जावेद लखपती, महेश काबरा, पारूल गुजराथी, बंटी परदेशी,एजाज शेख, अक्षय राजपूत, सुनील शिंदे, वकील शेख, अरबाज शेख, मोमिन सूर्रैया, अरबाज शेख, गणेश गायकवाड, समाधान जेजुरकर, गुड्डू जावळे, डॉ.सुधीर जाधव, मच्छिंद्र थोरात, सोहेल मोमिन, सुनील पैठणकर, संतोष खैरनार,देविदास निकम, भूषण लाघवे, सुमित थोरात, सचिन सोनवणे, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी गणेश अंधुरे, मयुर गोसावी, शेखर शिंदे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी केले.





