शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

हिवरगाव पठार–साकूर रस्त्यासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर!

---Advertisement---

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळणार आहे. हिवरगाव पठार ते साकूर या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (सीआरआयएफ) अंतर्गत तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती आमदार खताळ यांनी दिली.

याबाबत माहिती देताना आमदार खताळ म्हणाले की, हिवरगाव पठार ते साकूर हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याची सुधारणा व्हावी आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील होतो. याच अनुषंगाने नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतून आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

ग्रामीण भागातील रस्ते हे गावांना जोडणारे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले महत्त्वाचे माध्यम आहे. रस्त्यांची चांगली सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत जाणे तसेच नागरिकांना विविध कामांसाठी प्रवास करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे हिवरगाव पठार–साकूर रस्त्याच्या सुधारणा कामामुळे परिसरातील दळणवळणाला मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा देखील करत आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत. तर
या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment