शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्री साईबाबांच्या जीवनचरित्रावरील १२१ चित्रकृती संस्थानला देणगीस्वरूपात सुपूर्द

---Advertisement---

शिर्डी : श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून चेन्नई येथील श्री साई ट्रस्टचे संस्थापक तथा दानशूर साईभक्त श्री. के. व्ही. रमणी यांनी श्री साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित १२१ चित्रकृती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे देणगीस्वरूपात सुपूर्द केल्या.
या चित्रकृती ८ बाय ५ फूट आकाराच्या कॅनव्हास रोल स्वरूपात असून, त्यांना आकर्षक फ्रेम करून प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक चित्रकृतीमध्ये दर्शविण्यात आलेल्या प्रसंगाची माहिती देणारे स्वतंत्र माहिती फलकही तयार करण्यात येणार आहेत.
संस्थानच्या दर्शन रांग संकुल, श्री साईप्रसादालय, भक्तनिवास आदी ठिकाणी या चित्रकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या साईभक्तांना श्री साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे विचार व शिकवण यांची माहिती मिळणार असून, संस्थान परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment