श्रीरामपूर – श्रीरामपूर शहराचे प्रथम नगराध्यक्ष कै. रामचंद्र महाराज उपाध्ये यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्रीराम तरुण मंडळाच्या शारदोत्सवाची सांगता रावण दहनाने झाली. मंडळाचे हे ५८ वे वर्षे आहे.
दरवर्षी दसऱ्यानिमित्त विजयादशमीच्या दिवशी श्रीराम मंदिर चौकातून रावणाची मिरवणूक पाटाच्या कडेला नेली जाते आणि त्या ठिकाणी शहरातील सर्व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये रावण दहन केले जाते.
रावणाच्या अग्रभागी लिहिले जाणारे घोषवाक्य हे नेहमीच चर्चेचा विषय असते. या बोधवाक्यातून वर्षभरातील घटनांचा मागोवा घेऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.
यावर्षी रावणाच्या छातीवर लिहिलेले “कुणाचा कुणावर अंकुश नाही, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे” हे बोधवाक्य लक्षवेधी ठरले.या बोधवाक्याचा अनेकांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.
काल सायंकाळी सात वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून सजवलेल्या ट्रॅक्टरवर शारदा देवीची मूर्ती ठेवून संगीताच्या तालावर भव्य आतिषबाजीने या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, सुरेश सोनवणे, गौतम उपाध्ये, प्रकाश चित्ते, राजेंद्र देवकर आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.
बेलापूर रोडवर कॅनल साईट लगत मंडळाचे वतीने रावणाचे दहन रात्री दहा वाजता करण्यात आले.यावेळी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, मंडळाचे पदाधिकारी अशोक उपाध्ये,राजेंद्र सोनवणे, गौतम उपाध्ये, सुरेश सोनवणे, सतीश शहाणे,प्रकाश चित्ते, अयाज तांबोळी, बाळू क्षिरसागर, दिनेश अंभोरे, नंदू शिंदे, अतुल उपाध्ये,सिद्धार्थ उपाध्ये, सौ सपना उपाध्ये, सौ जयश्री उपाध्ये,राजेंद्र लचके आदी मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले.
शारदा उत्सव व मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अभिजीत भावसार, संदीप शेळके, बाळू उपाध्ये, जीत शेडगे, सिद्धार्थ सोनवणे, जयराम उपाध्ये, राहुल उपाध्ये, राजेंद्र भावसार, सुनील फुलारे, सुमित उपाध्ये सोमनाथ चापानेरकर सचिन डोळस बंटी शहाणे कृष्णा शहाणे गोपी शहाणे रमाकांत पाथरकर विजयकुमार पगारिया आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्रीराम तरुण मंडळाच्या शारदोत्सवाची रावण दहनाने सांगता





