शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्रात प्रथमच लाकडी घाण्याच्या तेलातील वड्याची अनोखी संकल्पना माझा महाराष्ट्र नी प्रत्यक्षात आणली

---Advertisement---

मुंबई : महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यपरंपरेला आरोग्यदायी आणि दर्जेदार स्वरूप देण्याच्या उद्देशाने कार्यरत ‘माझा महाराष्ट्र वडापाव सेंटर’ ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रात प्रथमच लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलात तळलेला वडा ही अभिनव संकल्पना ग्राहकांसाठी सादर करणाऱ्या या ब्रँडच्या ‘श्री स्वामीकृपा उपहार’ या नव्या नितीन कळंबे यांच्या फ्रेंचायसीचे उद्घाटन आदई (पनवेल) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

उद्घाटन सोहळा माझा महाराष्ट्रचे मुख्य प्रवर्तक दीपक काळीद यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून व फीत कापून संपन्न झाला. यावेळी उपस्थित माझा महाराष्ट्रचे प्रवर्तक प्रकाश ओहळे यांनी ‘माझा महाराष्ट्र वडापाव सेंटर’च्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. दुसरे प्रवर्तक व मॅक्सलॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज चे संचालक सहदेव कारंजकर यांनी श्री स्वामी उपहार च्या संचालिका नव्या नितीन कळंबे यांचे कौतुक करत, आरोग्यदायी, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यसंस्कृती जपण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. नव्या नितीन कळंबे यांनी माझा महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सत्कार केला. त्याचप्रमाणे त्यांना माझा महाराष्ट्र तर्फे सन्मानपत्र देण्यात आले. शुभावी ग्लोबल इंडस्ट्रीज यांच्या संचालक शुभांगी सोनवणे यांनी माझा महाराष्ट्र शॉपी ही प्रथम शॉपी माणगाव, रायगड येथे सुरू केली त्याबद्दल त्यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. माझा महाराष्ट्रचे अनिल चव्हाण व नम्रता शिंदे यांचे अथक परिश्रम तसेच नितीन कळंबे यांचा नव्या यांना असलेला भक्कम पाठिंबा यामुळे ह्या प्रथम फ्रेंचायसीचे उद्घाटन यशस्वीपणे संपन्न झाले.

यावेळी संस्थेच्या प्रवर्तकानी सांगितले की, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा गौरव वाढविण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांना दर्जेदार व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर फ्रेंचायसी नेटवर्क उभारण्याचा संकल्प आहे. भविष्यात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये ‘माझा महाराष्ट्र वडापाव सेंटर’च्या आणखी शाखा सुरू करण्यात येणार आहेत.

‘माझा महाराष्ट्र वडापाव सेंटर’ची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलात तयार करण्यात येणारा वडा. पारंपरिक पद्धतीने काढलेल्या तेलामुळे वड्याची अस्सल चव, सुगंध आणि पौष्टिकता टिकून राहते. त्यामुळे ग्राहकांना चव आणि आरोग्याचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळत आहे. याच वैशिष्ट्यामुळे या संकल्पनेला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, वडापाव क्षेत्रात हा एक नवा मापदंड ठरत आहे.

सोहळ्यास पाटील साहेब, देव पाटील, दगडू पाटील यांसह परिसरातील नागरिक, व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि खाद्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटना निमित्त उपस्थितांसाठी विशेष वडापाव चाखण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांनी लाकडी घाण्याच्या तेलात तयार केलेल्या वड्याच्या अनोख्या चवीचे मनापासून कौतुक केले.

‘अस्सल मराठमोळी चव, शुद्धतेची हमी आणि ग्राहकांचा विश्वास’ हे ब्रीद जपत ‘माझा महाराष्ट्र वडापाव सेंटर’ महाराष्ट्राच्या खाद्यविश्वात एक नवा आदर्श निर्माण करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment