मुंबई : वरळी येथील प्रतिष्ठित लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूल मध्ये, प्रामुख्याने प्रभादेवी व वरळी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या या शाळेत, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उल्लेखनीय शैक्षणिक व सर्वांगीण कामगिरीसाठी भव्य गौरव सोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी शाळेच्या परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेने १००% निकाल मिळविला आहे. या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला सौ. सुजाता शहा, सचिव, गुजराती संस्कार मंडळ, बिपीन भटाविया, अध्यक्ष, गुजराती संस्कार मंडळ ,दिनेश नागदा, खजिनदार, गुजराती संस्कार मंडळ सौ. आरती त्रिवेदी, सदस्य, गुजराती संस्कार मंडळ ,सौ. सारिका जाधव व कु. सोनाली, कार्यक्रम सहभागी, एकम फाऊंडेशन ,मुंबई ,नरेंद्र शिर्के, सचिव, आदर्श नगर सेवा समिती, रामदास राहाटे, सहसचिव, आदर्श नगर सेवा समिती, अनिल इंदुलकर, उपाध्यक्ष, आदर्श नगर सेवा समिती ,सौ. अंबिका रायपेल्ली, खजिनदार, आदर्श नगर सेवा समिती
अमित सावंत, सदस्य, आदर्श नगर सेवा समिती , दीपक कायंदेकर, समाजसेवक आणि सुनील करवाडे, माजी खजिनदार, आदर्श नगर सेवा समितीचे मान्यवर उपस्थित होते.
मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेतील कु. श्रवण पारकर – ९३.४०% ,
कु. अनुपम यादव – ९२.५०% ,कु. श्रुती कळंबे – ९१.२०%
कु अभय जैस्वाल – ८९.९०%,कु. मानसी जैस्वार – ८७.४०%
कु. सोनल जैस्वाल – ८७% या गुणवंत विद्यार्थ्यांना चषक,
भेटवस्तू व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय शैक्षणिक विषयात प्राविण्य मिळविलेल्या व इतर सहशालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना प्रशंसा चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. रीना वासुदेवन मुदलियार यांनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावरील कटिबद्धतेचा उल्लेख केला. या यशाचे श्रेय पात्र व अनुभवी शिक्षकवर्ग, शिस्त आणि पालकांच्या सातत्यपूर्ण सहकार्याला असल्याचे त्यांनी सांगितले.मान्यवरांनी शाळेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढेही अशाच प्रकारे उत्कृष्टता साध्य करण्यास प्रोत्साहित केले.
लिटल स्टार्स इंग्लिश हायस्कूलतर्फे एसएससी गुणवत्ताधारक व उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव








