शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक फौजदार प्रवीण आव्हाड सेवानिवृत्त

---Advertisement---

सोनई :-शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार प्रवीण एकनाथ आव्हाड हे दि. ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनिमित्त वतीने त्यांना पोलीस खात्या मार्फत निरोप देण्यात आला.प्रवीण आव्हाड यांनी सन १९९३ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. तब्बल ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी सोनई, पाथर्डी, बाभळेश्वर, नेवासा, शनिशिंगणापूर आदी विविध ठिकाणी कर्तव्य बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आपल्या शांत, संयमी व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांनी सहकारी कर्मचारी तसेच नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. जनसामान्यांशी सुसंवाद राखत पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment